स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (2024)

1. महिलांकरिता स्वाभिमान कोट्स

1. महिलांकरिता स्वाभिमान कोट्स2. स्वाभिमान जपणारे स्टेटस मराठी3. नात्यातील स्वाभिमान जपणारे कोट्स4. प्रेरणात्मक स्वाभिमान कोट्स5. बिनधास्त स्वाभिमान जपणारे कोट्स

Table of Contents

  1. महिलांकरिता स्वाभिमान कोट्स (Self Respect Quotes In Marathi For Women)
  2. स्वाभिमान जपणारे स्टेटस मराठी (Self Respect Status In Marathi)
  3. नात्यातील स्वाभिमान जपणारे कोट्स (Quotes On Self Respect In A Relationships)
  4. प्रेरणात्मक स्वाभिमान कोट्स (Self Respect Inspirational Quotes)
  5. बिनधास्त स्वाभिमान जपणारे कोट्स (Bold Self Respect Quotes In Marathi)

प्रत्येक माणसासाठी स्वाभिमान महत्त्वाचा असतो. जीवनात स्वाभिमान असेल तर ताठ मानेने जगता येते. अहंकार आणि स्वाभिमान यात बराच फरक आहे. प्रत्येक माणसाला आपला स्वाभिमान जपता आलाच पाहिजे नाहीतर प्रत्येक ठिकाणी अशा माणसांना गृहीत धरून त्यांचा फायदा तर घेतला जातोच पण त्यांचा बऱ्याच ठिकाणी अपमानही होतो. त्यामुळे आपण कुठे कसे वागायचे आणि स्वाभिमान कसा जपायचा हे प्रत्येकाला कळायलाच हवे. बऱ्याचदा आपण दुसऱ्याला ऐकवू शकत नाही पण अशावेळी आपल्या कामी येतात ते कोट्स (self respect quotes in marathi). स्वाभिमान स्टेटस मराठी भाषेमध्येदेखील आपण शोधत असतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही अप्रतिम स्वाभिमान कोट्स आणि स्टेटस (self respect status in marathi) देणार आहोत. तुम्हीही आता तुमचा स्टेटस अशा सुंदर मराठी ओळींनी अधिक आकर्षक करू शकता. तुम्हाला तुमच्या भावना शब्दात मांडण्यासाठी आम्ही मदत करत आहोत. तुम्हालाही उपयोगी ठरतील हे स्वाभिमान स्टेटस आणि कोट्स. पण त्याआधी स्वाभिमान म्हणजे नक्की काय हे तर जाणून घ्यायलाच हवं. आपल्या मनात स्वतःबद्दलची असलेली प्रतिमा म्हणजे स्वाभिमान. अरेरावी स्वभाव ठेऊन अरेला कारे असं नाही म्हटलं तरीही कोणत्या प्रश्नावर हो का विचारायचं आहे ते कळणं म्हणजे स्वाभिमान. तुमच्यावर कोणतेही आरोप होत असताना त्याला समर्पक आणि योग्य उत्तर देणे म्हणजेच स्वाभिमान. तुम्ही जर स्वाभिमान जपलात तर कोणालाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाण्याचं धैर्य होत नाही. अहंकाराच्या टोकापर्यंत न पोहचता अभिमान बाळगणे म्हणजेच स्वाभिमान. स्वाभिमान हा प्रदर्शनीय नसतो तर तो आपली प्रत्येकाची शान असतो. ती एक संस्मरणीय ठेव असते. असाच आपला स्वाभिमान जपण्यासाठी काही खास कोट्स आणि स्टेटस आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

महिलांकरिता स्वाभिमान कोट्स (Self Respect Quotes In Marathi For Women)

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (1)

Canva

1. मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काहीही नाही. मुलींना आदर द्या आणि तुम्हीही आदर मिळवा

ADVERTIsem*nT

2. हवं तसं जगायला आवडतं मला, लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये

3. एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की, ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी. वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही

4. जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार? अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा

5. मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत. त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो

ADVERTIsem*nT

6. मुलगी ‘माल’ नाही तर मान असते, ‘सामान’ नाही तर सन्मान असते

7. स्त्री ही सर्वात मोठी ताकद आहे अशी ताकद जी पुरूषालाही जन्म देते

8. पुरूषांनी स्त्री ला समान मानायला हवं सामान नव्हे

9. प्रत्येक महिलेने स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार बना, शिकार नाही

ADVERTIsem*nT

10. नातं कोणतंही असो पण आपल्या स्वाभिमानाला आणि आपल्या इज्जतीला सर्वात जास्त महत्त्व द्या. तरच तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य राहू शकता. जिथे चुकताय तिथे सॉरी म्हणा, असे अनेक मेसेज अथवा कोट्स आपल्याला मिळतात, पण नको तिथे माफी मागायला जाऊ नका.

11. एकवेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील पण स्त्री चा आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा

12. जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून तुम्हाला आदर मिळावा ही अपेक्षा करू शकत नाही.

13. स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे, जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते

14. प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल

15. बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं पण खऱ्या स्त्री ला हवा असतो तो आदर, तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर

आयुष्याला प्रेरणा देणारे लेखक व. पु. काळे यांचे कोट्स (Va. Pu. Kale Quotes In Marathi)

स्वाभिमान जपणारे स्टेटस मराठी (Self Respect Status In Marathi)

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (2)

ADVERTIsem*nT

Canva

1. अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे

2. तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज, कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा, यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात

3. कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता

ADVERTIsem*nT

4. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगलं आहे, यालाच स्वाभिमान जपणं असं म्हणतात

5. अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाचं आहे पण तुमचा स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही

6. नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा. पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा

7. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं. कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा

ADVERTIsem*nT

8. स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही

9. स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही. पण स्वाभिमान जपणं हेदेखील महत्त्वाचं आहे

10. आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका

11. जे माझा आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही. तुम्ही याला अहंकार म्हणत असाल पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे

ADVERTIsem*nT

12. महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा

13. काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड करणं फारच कठीण होऊन जातं

14. स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं

15. कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. स्वाभिमानच सर्व काही आहे

ADVERTIsem*nT

आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार….(Father’s Day Quotes In Marathi)

नात्यातील स्वाभिमान जपणारे कोट्स (Quotes On Self Respect In A Relationships)

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (3)

Canva

1. नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे

ADVERTIsem*nT

2. नात्यात केवळ प्रेमालाच जपणं गरेजचं नाही तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचे आहे

3. कोणत्याही नात्याला जपण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची तडजोड करणं कधीच योग्य नाही

4. स्वाभिमानाशी तडजोड करत नातं जपायचं असेल तर मी आयुष्यात एकटं राहण्याला प्राधान्य देईन

5. कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही. कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही

ADVERTIsem*nT

6. तुमच्या मनाची शांतता, स्वाभिमान, मूल्य यांचा भंग करणाऱ्या माणसांपासून दूर राहणं हाच शहाणपणा आहे. कारण कोणत्याही नात्यात स्वाभिमानाला तडा जाणं हे परवडण्यासारखे नाही

7. कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका. स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे

8. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, आदर आणि स्वाभिमानावर टिकून असतो

9. कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला

ADVERTIsem*nT

10. ज्या क्षणी तुम्ही नात्यासाठी कोणाकडे तरी आर्जव करायला लागता, त्याचवेळी तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावता. त्यामुळे कधीही नात्यात आर्जव करू नका

मुलींसाठी खास रुबाबदार स्टेटस मराठी

प्रेरणात्मक स्वाभिमान कोट्स (Self Respect Inspirational Quotes)

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (4)

Canva

स्वाभिमान जपण्याची गरज सगळ्यांना असते. असेच काही प्रेरणात्मक कोट्स तुमच्यासाठी.

ADVERTIsem*nT

1. अशा लोकांच्या पाठी अजिबात वेळ घालवू नका ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नाही. अशा वेळी काहीही न बोलता स्वाभिमान जपणं जास्त महत्त्वाचे

2. लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका. लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार. पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहीलं तर अशा लोकांचा विचार मनातही येत नाही

3. कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करताना जर आपली चिडचिड झाली आणि आपण दुखावलो गेलो तर अर्थात तो आपला अहंकार आहे पण हेच स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत राहिलो तर त्याला नक्कीच स्वाभिमान म्हणतात

4. चांगलं दिसणं याचा अर्थ स्वतःला सतत महत्त्व देणं असा होत नाही तर स्वाभिमान जपणं असा होतो

ADVERTIsem*nT

5. आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवे. स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो

6. स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान होणार नाही

7. इतरांकडून तुम्हाला स्वीकारलं जाण्याची वाट पाहण्याची खरंच गरज नाही. स्वाभिमान जपत तुम्ही स्वतः आधी स्वतःला स्वीकारा त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल याची खात्री बाळगा

8. स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी स्वाभिमान जपा

ADVERTIsem*nT

9. लोकांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपल्याला काय हवंय ते आधी पाहा. स्वाभिमान जपला तर कोणाशीही तुलना करण्याची अजिबातच गरज भासणार नाही. कारण तेव्हा आपण स्वतःला अधिक समजून घेऊ शकतो

10. स्वाभिमान जपूनच तुम्ही इतरांकडून आदर मिळवू शकता हे नेहमी लक्षात ठेवा

तुमचीही ‘फॅशन’आहे जरा हटके… मग तुमच्यासाठी खास (Fashion Quotes In Marathi)

बिनधास्त स्वाभिमान जपणारे कोट्स (Bold Self Respect Quotes In Marathi)

1. अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे

ADVERTIsem*nT

2. तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यावर कधीही मात करू देऊ नका. कारण असं झालं तर तुमचा स्वाभिमान डळमळायला लागेल आणि सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होईल

3. स्वाभिमान जपण्यासाठी तुम्हीच कणखरपणे उभं राहायला हवं. तुम्हाला मदत करायला कोणीही येणार नाही

4. स्वतःची जबाबदारी स्वतःच स्वीकारायला शिकलं तर आपोआप स्वाभिमान जपला जातो. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत जगण्यात काहीच अर्थ नाही

5. इतरांकडून तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी आदर मिळवला असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहे. मात्र अहंकारात त्याचा बदल होऊ देऊ नका

ADVERTIsem*nT

6. स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते

7. स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. सुधारण्यासाठी काम केल्यास, स्वाभिमान जपला जातो आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो

8. कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.

9. आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो. मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा जास्त विचार का करतो? मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या

ADVERTIsem*nT

10. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

देखील वाचा –

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes In Marathi)

ADVERTIsem*nT

प्रेमभावना व्यक्त करणारे सॅड स्टेटस (Love Sad Status In Marathi)

Breakup Quotes In Marathi (ब्रेकअप कोट्स मराठी)

स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स (Self Respect Quotes In Marathi) - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi site (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Corie Satterfield

Last Updated:

Views: 6002

Rating: 4.1 / 5 (62 voted)

Reviews: 93% of readers found this page helpful

Author information

Name: Corie Satterfield

Birthday: 1992-08-19

Address: 850 Benjamin Bridge, Dickinsonchester, CO 68572-0542

Phone: +26813599986666

Job: Sales Manager

Hobby: Table tennis, Soapmaking, Flower arranging, amateur radio, Rock climbing, scrapbook, Horseback riding

Introduction: My name is Corie Satterfield, I am a fancy, perfect, spotless, quaint, fantastic, funny, lucky person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.